आजची रेसिपी : सोलकढी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

७ ते ८ आमसुलं, एक कप नारळाचे दूध, १ ते २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून २ लसूण पाकळ्या, २ टे. स्पून कोथिंबीर, बारीक चिरून, १/२ टी स्पून जिरेपूड, चवीपुरते मिठ, १/२ टी स्पून तूप, १/२ टी स्पून जिरे.

entertainment साहित्य - ७ ते ८ आमसुलं, एक कप नारळाचे दूध, १ ते २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून २ लसूण पाकळ्या, २ टे. स्पून कोथिंबीर, बारीक चिरून, १/२ टी स्पून जिरेपूड, चवीपुरते मिठ, १/२ टी स्पून तूप, १/२ टी स्पून जिरे.

कृती - १) आमसुलं १/२ कप गरम पाण्यात भिजत टाकावीत. अर्ध्या-पाऊण तासाने त्याच पाण्यात आमसुलं कुस्करून घ्यावीत आणि पाणी गाळून घ्यावे. २) कोथिंबीर आणि मिरची एका वाडग्यात घ्यावे. त्यात किंचीत मिठ घालून हाताने किंवा चमच्याने कुस्करावे. ३) लसूण बारीक चिरून घ्यावा. ४) जिरे किंचीत कुटून घ्यावेत.

फोडणी न करता सोलकढी - नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर मिरची, चिरलेला लसूण आणि कुटलेले जिरे मिक्‍स करावेत. चवीपुरते मिठ घालावे.

फोडणी केलेली सोलकढी - नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर, मिरची आणि चिरलेला लसूण घालून मिक्‍स करावे. चवीपुरते मिठ घालावे. कढईत तूप गरम करून त्यात कुटलेले जिरे घालून ही फोडणी नारळ दुधाच्या मिश्रणात घालावी आणि निट मिक्‍स करावे. थंडच सर्व्ह करावे किंवा अगदी मंद आचेवर कोमटसर करावे, जास्त गरम करू नये. सर्व्ह करताना वरून जिरेपूड भुरभुरावी. जिरेपूड आधीच मिक्‍स करू नये,  नाहीतर सोलकढीचा रंग बदलतो. सोलकढी नुसतीच किंवा भाताबरोबर खायलाही छान लागते.

टीप - १)  १/४ कप घट्टसर आंबट ताक घातले तर खूप छान चव येते. २) कोकमाचे आगळ म्हणजेच साखरविरहित कोकमाचा घट्ट कोळ (Kokum Concentrate) बाजारात विकत मिळतो. ते वापरूनही सोलकढी बनवता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: todays recipe solkadhi