esakal | व्हेजिटेबल समोसाची वेगळी रेसिपी; एकदा नक्की ट्राय करा

बोलून बातमी शोधा

व्हेजिटेबल समोसाची वेगळी रेसिपी; एकदा नक्की ट्राय करा
व्हेजिटेबल समोसाची वेगळी रेसिपी; एकदा नक्की ट्राय करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : समोसा भारताचे सर्वाधिक पसंदीत डीश आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीला समोसा आवडतोच. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतातील हे सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड मानले जाते. एक उत्तम स्नॅक म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु जर तुम्ही बटाट्याचा समोसा खाऊन कंटाळला असाल, तर चिंता करू नका. थोडे वेगळेपण हवे असेल तर तुम्ही व्हेजिटेबल समोसा ट्राय करू शकता. सायंकाळचा नाष्टाचा हा एक उत्तम पर्याय आहे. खमंग, कुरकुरीत, तोंडाला चव आणणारा हा एक सोपा पदार्थ आहे. ज्याच्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. काही हलके मसाले, भाज्या यांच्यापासून हा तयार होतो. ही एक नोर्थिंडियन डिश आहे. लाल चटणी, पुदिना चटणी किंवा चहा सोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.

कसा बनवाल व्हेजिटेबल समोसा

व्हेजिटेबल समोसा बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला बटाटा, गाजर, वाटाणे आणि फ्लॉवर उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर पॅनमध्ये याला हिरवी मिरची आणि आलं घालून गरम करून घ्याव लागेल. त्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी हे मिश्रण शिजवून घ्यायचे. भाज्यांना हलकेच स्मॅश करून त्यात चाट-मसाला, काळ मीठ, लाल मिरची आणि मसाला एकत्र करून मिश्रण तयार करून घ्यावे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करावे. या मिश्रणाला रिफाइंड आट्यांमध्ये भरून मंद आचेवर डीप फ्राय करून घ्यावे. तुमचा कुरकुरीत, खमंग समोसा खाण्यासाठी तयार आहे.