esakal | ग्लॅम-फूड : आलू पराठा...यम्मी! | Aloo Paratha
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal

ग्लॅम-फूड : आलू पराठा...यम्मी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- विकी कौशल

विकी कौशल व्यायाम आणि फिटनेसच्या बाबतीत अतिशय दक्ष असला, तरी तो ‘फूडी’ आहे. विकी ग्लॅमरच्या क्षेत्रात असला, तरी तो पंजाबी पद्धतीच्या घरगुती जेवणाचा चाहता आहे. भरपूर तूप घातलेली डाळ, त्यासोबत गरमागरम रोटी ही त्याची आवडती डिश.

लहानपणी सकाळी नाश्त्याला लोणी लावलेला आलू पराठा हा विकीसाठी सर्वांत आवडता पदार्थ होता. जेवणात गव्हाचा पदार्थ नसेल, तर जेवणाला पूर्णत्व येत नाही, असे त्याचे मत आहे. शूटिंगच्या दरम्यान विकी नेहमी जेवणाचा लहान डबा सोबत ठेवतो. त्याचा स्मूदीजवर जास्त भर आहे. स्मूदीजमध्ये तो पालेभाज्यांचा जास्त समावेश करतो. कारमधून प्रवास करताना, शूटिंगच्या दरम्यान तो शक्यतो स्मूदीजच घेतो. त्याला त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सेटवर घरगुती जेवण मिळत नाही, त्यामुळे आईच्या हातचे लोणी लावलेले आलू पराठे आणि लोणचे तो खूप मिस करतो. विकीचं ‘मेटॅबोलिझम’ वेगवान आहे. त्यामुळे कितीही खाल्लं तरी अंगी लागायचं नाही. ‘उरी’च्या वेळी त्याला तब्बल १५ किलो वजन वाढवावं लागलं. त्यावेळी त्यानं खाणं खूप वाढवलं होतं; मात्र त्याला भरपूर व्यायामाचीही जोड दिली होती.

विकी कटाक्षाने ‘डाएट प्लॅन’ पाळत असला, तरी कधी तरी आवडीचे पदार्थ खाण्याची संधी तो सोडत नाही. त्याच्यासाठी ‘चिट डे’ हा दर पंधरा दिवसांनी एकदा तरी येतच असतो. त्याचबरोबर तो ‘मेक्सिकन’, ‘लेबनीज’ फूडचा आणि मराठमोळ्या पदार्थांचाही चाहता आहे. कारण ते बनवायला सोपे आहे, असे त्याचे मत आहे. तो प्रचंड खवय्या असला, तरी स्वयंपाकात मात्र त्याला चहा आणि मॅगीखेरीज काहीही बनवता येत नाही. शूटिंग अनेकदा १६-१८ तास सुरू असल्याने सेटवर पचायला सोपे, हलके असे जेवण असावे म्हणून तो शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतो.

विकी ‘स्ट्रीट फूड’चाही शौकीन आहे. रस्त्यावरील पाणीपुरी हा मेन्यू टेस्ट केला नाही, तर जीवनच अपूर्ण आहे, असे त्याला वाटते. गोड पदार्थांमध्ये जिलेबीसोबत रबडी ही त्याची आवडती स्वीट डिश. कोल्ड कॉफी त्याला आवडते आणि ती बनवताही येते. ‘नोलेन गुर’ हा त्याचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर आहे.

loading image
go to top