esakal | आता काय तर चायनिज बिर्याणी! व्हायरल झालाय व्हिडिओ Video Of Chinese Biryani Goes Viral
sakal

बोलून बातमी शोधा

आता काय तर चायनिज बिर्याणी! व्हायरल झालाय व्हिडिओ

आता काय तर चायनिज बिर्याणी! व्हायरल झालाय व्हिडिओ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

स्वयंपाकघरात लोक काहीना काही प्रयोग करत असतात. आणि त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करत असतात. मध्यंतरी मॅगी मिरची आणि बलून रोटीच्या व्हिडिओवर लोकांनी सणकून टिका केली होती.त्यात आता कहर म्हणजे युट्युबवर चायनिज बिर्याणीचा व्हिडिओ नुकताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

कुकिंग विथ सरिया या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर झाला असून तो आतापर्यंत 85 लाख लोकांनी पाहिला आहे. फोटो बघून याला बिर्याणी म्हणावं का असा प्रश्न पडेल. भाज्या आणि चिकन एकत्र करून केलेली ही बिर्याणी चायनिज फ्राईड राईस सारखी दिसते. अनेक लोकांनी या डिशला विरोध तर केलाच. पण एकसोएक कमेंट्स, मीम्स केल्या आहेत. काही वेगळे जिन्नस एकत्र करून या महिलेने एग फ्राईड राईसला चायनिज ब्रिर्याणी म्हटलं असावं, अशी कमेंट एकांन केलीय. तर एकाने मैने सब कुछ देखा है... अशी कमेंट केलीय.

या व्हिडिओमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे दिसून येते आहे.

loading image
go to top