esakal | Summer Special: मसालेदार कलिंगड 'सुप'ची सोपी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

Summer Special: मसालेदार कलिंगड 'सुप'ची सोपी रेसिपी

Summer Special: मसालेदार कलिंगड 'सुप'ची सोपी रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात कलिंगड जास्त खाल्ले जाते. हे एक असे फळ आहे जे गरमीध्ये शरीर हायड्रेड ठेवण्यासाठी मदत करतात. यामध्ये पोषक तत्वे अधिक प्रमाणात असतात. जी आरोग्यासाठी उत्तम असतात. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते. तसेच हे विटामिन आणि खनिजे यांचं भांडार मानलं जातं. हायड्रेड करण्यापासून ते ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करण्यापर्यंत कलिंगडचे अनेक फायदे आहेत. आपण फक्त थंड कलिंगड खाण्याला पसंती देतो. परंतु तुम्ही याचं सुप कधी बनवून पाहिले आहे? तर आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत...

कृती -

कलिंगडचे तुकडे आणि पुदिना एका जारमध्ये घाला आणि ते बारीक करून वेगळे ठेवा. एका पॅनमध्ये तेल गरम करा. आणि त्यामध्ये आलं, लसूण पेस्ट, तिखट, घालून हलकी फोडणी द्या. त्यानंतर यामध्ये कलिंगडची प्युरी घालून मिक्स करा. ते थंड होऊ द्या. यानंतर कमीतकमी एक तास हे रेफ्रिजरेटमध्ये ठेवा. पुदिन्याच्या पानांसोबत गार्नीशिंग करून थंड करा. तुम्ही हवे असल्यास बर्फाचे तुकडेही घालू शकता. तुमचे कलिंगड सुप तयार आहे.