
वीकेंडला सकाळी नाश्त्यात चीझ गार्लिक ब्रेड तयार करु शकता. ही रेसिपी इतकी सोपी आहे की नवशिक्याही घरी सहज बनवू शकतात. फक्त काही साहित्य आणि 15-20 मिनिटांत तुमचा नाश्ता तयार! ओव्हन असो वा तवा, तुम्ही दोन्ही पद्धतींनी हा ब्रेड बनवू शकता. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही डिश टोमॅटो सॉस किंवा डिपसोबत सर्व्ह केल्यास आणखी मजा येते. वीकेंडला सकाळी काहीतरी वेगळे आणि चविष्ट खायचे असेल, तर ही चीझ गार्लिक ब्रेड रेसिपी नक्की ट्राय करा.