

Morning Breakfast Recipe
Sakal
Sunday Morning Breakfast Recipe: फिट राहण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात निरोगी करायची असेल तर सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत तेलकट आणि जड पदार्थांमुळे वजन वाढ, पचनाच्या समस्या आणि थकवा जाणवतो. अशा वेळी ज्वारीच्या पीठापासून बनवलेला डोसा हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय ठरतो. ज्वारी ही ग्लुटन-फ्री धान्य असून फायबर, प्रथिने, लोह आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे हा डोसा पोटभर खाण्यासोबतच दिवसभर ऊर्जा देतो. ज्वारीचा डोसा वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो, रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. खास म्हणजे हा डोसा तयार करणे अतिशय सोपे असून फारसा वेळही लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.