

Palak Cutlet Recipe
sakal
तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर दिवसभराची ऊर्जा आणि उत्साह अवलंबून असतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. मात्र रोज पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी वेगळं आणि पौष्टिक बनवण्याचा विचार नक्कीच मनात येत असेल. अशावेळी पालक कटलेट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पालक, बटाटा आणि मसाल्यांच्या चवीने भरलेले हे खुसखुशीत कटलेट केवळ चविष्टच नाहीत तर शरीराला आवश्यक पोषणही देतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे.