Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weigh Loss Breakfast

Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे

Soya Poha Recipe : पोह्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन्स, फायबर, कार्ब्ज आणि व्हिटॅमिन असतात. पोहे पचायला हलके असतात म्हणून लोकं नाश्त्याला पोहे बनवणं पसंत करतात. पण तुम्ही सोया पोहे खाल्लेत कधी? जाणून घ्या रेसिपी.

साहित्य

सोया चंक्स १ कप, भिजवलेले पोहे दीड कप, मिरच्या २, शेंगदाणे, मोहरी, कढीपत्ता, अर्धा बारीक चिरलेला कांदा, हळद, लिंबाचा रस १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ

हेही वाचा: Instant Breakfast Recipe : रोजच्या ब्रेकफास्टने कंटाळा आलाय; मग झटपट बनवा रवा पोहे डोसा

कृती

  • दोन कप गरम पाण्यात सोया चंक्स टाका. १५ मिनीटं भिजू द्या.

  • नंतर पाणी काढून एका भांड्यांत ठेवा.

  • मग एका कढईत तेल गरम होऊ द्या.

  • त्यात कांदा, मिरची, कढीपत्ता टाका.

  • हे सर्व ३-४ मिनीटं शिजू द्या.

हेही वाचा: Breakfast : नाश्त्यासाठी हे पदार्थ ठरतील उत्तम

  • यात शेंगदाणे घालून नीट परता.

  • न्तर त्यात सोया चंक्स आणि मीठ टाकून नीट मिक्स करा.

  • त्यात भिजवलेले पोहे घालून व्यवस्थित हलवून घ्या.

  • ५ मिनीटं वाफ घ्या. मग त्यात वरून लिंबू कोथिंबीर घाला.

  • पौष्टीक सोया पोहे तयार.

टॅग्स :recipePohabreakfast