
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तीळ खाण्यासाठीही गरजेचं असते. धार्मिक कारणास्तव म्हणा किंवा आरोग्याच्या आधारावर म्हणा, तीळ खाणे खूप फायदेशीर आहे.
Makar Sankranti Festival : मकर संक्रात हा सण दरवर्षी जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. भारतात हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांत हा सण सौरकालगणनेशी संबंधित आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत लोक एकमेकांशी असलेले हेवेदावे विसरुन नातेसंबंधांची सुरवात पुन्हा एकदा नव्याने सुरु करतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तीळ खाण्यासाठीही गरजेचं असते. धार्मिक कारणास्तव म्हणा किंवा आरोग्याच्या आधारावर म्हणा, तीळ खाणे खूप फायदेशीर आहे.
काय आहे तिळाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व ?
तीळ खाण्यामुळे त्वचा मुलायम राहते. तसेच तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. तिळाने त्वचा कोरडी पडत नाही. बाळंत झालेल्या स्त्रीला जर पुरेसे दूध येत नसेल तर तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. यामुळे दुधात वाढ होते. ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते. ज्यांना मुतखडा आहे त्यांच्यासाठी हे लाभदायक आहे. केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी देखील तिळाचे तेल केसांना लावणे उत्तम. तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.
काय आहे धार्मिक महत्त्व?
1. तिळाचे महत्व :
मकर संक्राती दिवशी तिळाने सूर्य, विष्णू, शनिदेवाची पूजा केली जाते. याबाबतची कथा अशी आहे की, शनी महाराजांनी आपल्या वडिलांना राग आल्यावर शांत ठेवण्यासाठी तिळाची पूजा केली होती, असं म्हणतात. या कथेनुसार, तिळाची पूजा केल्याने शनी महाराजांना सूर्यदेव प्रकट झाले होते. त्यांनी शनिमहाराजांना वरदान दिले कि, जेव्हा कधी मी मकर राशीत प्रवेश करील त्यादिवशी तिळाद्वारे माझी पूजा कर. यामुळे शनीचा दोष नष्ट होऊन सुख, समृद्धी आणि शांती लाभेल. आणि याच प्रथेनुसार संक्रांत साजरी केली जाते.
2. गुळाचे महत्व :
ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचेही महत्व अधिक असल्याचे सांगितले जाते. गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य, शनी आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते. तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होऊन सर्वत्र शांती पसरते आणि शनिमहाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो, असं म्हणतात.