बटाट्याचे दूध म्हणजे काय आणि ते कसे बनवले जाते? जाणून घ्या

बटाट्याचे दूध सर्व लोकांसाठी सुरक्षित आहे
 potato milk
potato milk esakal

तुम्हाला माहिती आहे का की, सुमारे 60 ते 65 टक्के भारतीय हे लैक्टोस इंटोलरेंस (lactose intolerant) आहेत, याचा अर्थ भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला दूध पचवता येत नाही. अशा स्थितीत अनेकांना दुधाची अॅलर्जी आहे हेही माहीत नसते. दूध प्यायल्यानंतर अनेकांना पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे दुधाचे काही पर्याय आहेत जसे की बदामाचे दूध, तांदळाचे दूध आणि सोया दूध. कालांतराने, हे सर्व प्रकारचे दूध देखील लोकप्रिय होत आहेत. यापैकी 'बटाटा दुधा'ची मागणी देखील वाढत आहे. ज्यांना दूध सहज पचत नाही त्यांच्यासाठी बटाट्याचे दूध भविष्यात चांगला पर्याय ठरू शकतो.

बटाट्याचे दूध म्हणजे नक्की काय?

दुधाला आरोग्यदायी नॉन-डेअरी पर्यायांची वाढती मागणी पाहून, डग (एक स्वीडिश कंपनी) यांनी बटाट्याच्या दुधाची संकल्पना मांडली. हे वनस्पती-आधारित दूध आहे आणि ब्रँडच्या पेटंट पद्धतीने तयार केले जाते, ज्यामध्ये उकडलेले बटाटे गाळून ते पाणी, रेपसीड तेल आणि इतर सर्व घटक मिसळले जातात.

बटाट्याचे दूध घरीही बनवता येते

सर्व प्रथम सोललेले बटाटे मऊ होईपर्यंत उकळवा. उकळुन झाल्यावर चाळून घ्या आणि पाण्यात मिसळा. या स्टेपमध्ये तुम्ही बदाम, व्हॅनिला इसेन्स किंवा इतर कोणताही आवडता स्वाद घालू शकता. गुळगुळीत होईपर्यंत एका वाडग्यात मिसळा. योग्य चव आणि एकत्र मिळून येण्यासाठी अधिक पाणी घाला. फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड होऊ द्या.

बटाट्याचे दूध किती पौष्टिक आहे

फक्त 39 कॅलरीज आणि 0.1 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅटसह, बटाट्याचे दूध सर्व लोकांसाठी सुरक्षित आहे. परंतु असे आढळून आले आहे की या दुधाच्या पर्यायामध्ये सोया आणि बदामाच्या दुधासारख्या इतर पूरक पदार्थांपेक्षा कमी प्रथिने असतात. या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, रिबोफ्लेविन आणि फॉलिक अॅसिड देखील भरपूर असते. बटाट्याचे दूध देखील ग्लूटेन-मुक्त आहे, जे गहू, शेंगदाणे आणि दुधाची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी ते एक आरोग्यदायी पर्याय आहे.

 potato milk
सिंधुदुर्ग : रोज ६२ लाखांचे दूध आयात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com