
संदीप लांडगे
Unique Biryani: शहराचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा हा फार समृद्ध आहे. मुघलकालीन वास्तू, ऐतिहासिक किल्ले आणि बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले छत्रपती संभाजीनगर खाद्यसंस्कृतीसाठीदेखील विशेष प्रसिद्ध आहे. त्यात ‘औरंगाबादी बिर्याणी’ हा एक विशेष पदार्थ आहे; जो केवळ या शहरातीलच नाही, तर देशभरातील खाद्यप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.