
Winter Health: हिवाळ्यात पालेभाज्या खाणे आरोग्यदायी ठरते. हिवाळ्यात अनेक लोक मोठ्या आवडीने मुळा खातात. पण मुळा खाताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चहासोबत मुळा पराठा खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. पण त्याच्यासोबत काही पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. चुकीच्या खाद्यपदार्थांमध्ये मुळा मिसळल्याने पचनासंबंधित समस्या वाढू शकतात. असे कोणते पदार्थ आहेत जे खाणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.