Winter Recipe : पारंपरिक पध्दतीने कवठाची चटणी कशी तयार करायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Recipe

Winter Recipe : पारंपरिक पध्दतीने कवठाची चटणी कशी तयार करायची?

Kavathachi Chutney: कवठ हे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल किंवा कपित्थ असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये हे ‘वूड एप्पल’ असे म्हणतात. कवठाचे वैज्ञानिक नाव हिरोनिया लिमोनिया आहे. या फळावरील आवरण फिकट पांढ-या रंगाचे असते आणि एखाद्या कवचाप्रमाणे कडक असते. कवचाच्या आतील गर विटकरी रंगाचा असतो. हा गर चवीला आंबट गोड लागतोकवठामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात.

हे फायबर शरीरातील पचनक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास असेल त्यांनी कवठाचे सेवन करायला हवे.कवठामध्ये खूप प्रमाणात बीट कॅरोटीन असते. बिट कॅरोटीन शरीरात विटामिन ‘ए’ मध्ये हे रूपांतरित होतं. ज्यामुळे तुमची दृष्टी क्षीण होणार नाही.कवठामध्ये विटामिन सी सुद्धा चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते.हिवाळ्यात  स्वतःची रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही कवठाचे सेवन करू शकता. आजच्या लेखात आपण पारंपरिक पद्धतीने कवठाची चटणी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

हेही वाचा: Winter Recipe: चवदार ओल्या कांद्याची चटणी कशी तयार करायची?

साहित्य:

दोन मोडे कवठ 

अर्धा वाटी ‌गुळ  

एक चमच लाल तिखट 

मीठ चवीनुसार

अर्धा चमचा जिरे पूड 

लसूण पाकळ्या

तेल 

हिंग 

मोहरी 

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात चवदार लागणारी हिरव्या टोमॅटो चटणी कशी तयार करायची?

कृती:

सर्वप्रथम दोन मोडे कवठ घेऊन ते फोडून त्याचा मस्त गर काढून घ्यावा. कवठाचा गर काढून त्यात गुळ, लसुण,मिठ घालून हे मिश्रण मस्त मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.नंतर हे मिश्रण एका वाटीत काढून घ्यावे आणि तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, जिरे पावडर,लाल तिखट  घालावे फोडणी तडतडल्यावर चटणीवर घालून चांगले मिसळून घ्यावे. अशा रितीने आपली कवठाची आंबटगोड चटणी तयार झाली आहे.