Winter Recipe: नागपुरची स्पेशल खुसखुशीत पुडाची वडी कशी तयार करायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pudachi Vadi

Winter Recipe: नागपुरची स्पेशल खुसखुशीत पुडाची वडी कशी तयार करायची?

Pudachi Vadi : हिवाळ्यात जशीजशी थंडी पडू लागते तेव्हा आपोआप आपल्या जिभेला खमंग खुसखुशीत पदार्थ खाण्याची चटक लागते . हिवाळ्यात जिभेची चटक आणि शरीराला पौष्टिक घटक देणारी एक भन्नाट रेसिपी आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

साहित्य 

1) एक वाटी कणीक

2) एक वाटी बेसन

3) अर्धा वाटी ओट्स पीठ

4) अर्धा वाटी सोयाबीन पीठ 

5) दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर

6) अर्धा वाटी भाजलेलं सुकं खोबरं

7) पाव वाटी भाजलेली खसखस

8) आलं-लसूण पेस्ट

9) लाल तिखट

10) धने-ज‌रिे पावडर

11) गोडा मसाला

12) उकडलेले मक्याचे दाणे

13) चीज

14) थोडी साखर

15) मीठ

16) तेल

हेही वाचा: Winter Recipe : हिवाळ्यात पारंपरिक पध्दतीने हरभऱ्याची भाजी कशी तयार करायची?

कृती : कणीक, बेसन, ओट्स पीठ आणि सोयाबीन पीठ एकत्र करून त्यात मीठ, तिखट, धने-जिरे पावडर आणि तेलाचं मोहन घालून घट्ट पीठ भिजवावं. कोथिंबीर, खसखस, सुकं खोबरं, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, गोडा मसाला, टोफू, उकडलेला मका, चीज आणि थोडी साखर एकत्र करा. आता भिजवलेल्या पिठाची गोळी करून आयताकृती लाटून घ्यावी. त्याला एक चमचा तेलात एक चमचा गोडा मसाला याप्रमाणे पेस्ट करून लावून त्यावर वरील सारण भरून लांबट बाजू एकावर एक चिकटवून घ्यावी. दोन्ही बाजूच्या कडाही चिकटवून घ्याव्यात. या वड्या तेलामध्ये तळून घ्याव्या. अशा रितीने आपल्या पुडाच्या वड्या तयार झालेल्या आहेत.