

sol kadhi Gole Recipe:
Sakal
easy solyache kadhigole at home: हिवाळा म्हटलं की गरमागरम, घरगुती आणि चविष्ट पदार्थांची आठवण आपोआप येते. याच थंडीत बाजारात सहज मिळणाऱ्या तुरीच्या शेंगांचा सिझन फारच कमी काळासाठी असतो. त्यामुळे शेंगाचा सिझन संपायच्या आधी सोल्याचे कढिगोळे एकदा नक्की ट्राय करायलाच हवेत. हा पारंपरिक पदार्थ चवीला तर अफलातून लागतोच, पण शरीरासाठीही आरोग्यदायी असतो. मऊसूत सोल्याचे गोळे आणि आंबट-तिखट कढी यांची जोडी म्हणजे हिवाळ्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला खूप सोपी असून घरातील साध्या साहित्यांतून सहज तयार होते. जेवणात काही वेगळं आणि खास बनवायचं असेल, किंवा कुटुंबीयांना हिवाळ्यातील पारंपरिक चवीची मेजवानी द्यायची असेल, तर सोल्याचे कढिगोळे हा उत्तम पर्याय ठरतो. गरमागरम भात किंवा चपातीसोबत हा पदार्थ सगळ्यांनाच आवडेल. सोल्याचे कढीगोळे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.