अठरा हाताचा बाप्पा अन् अठरा वर्ष तप

famous eighteen hand ganpati  story in Ratnagiri  But due to the  temple is currently closed for public viewing
famous eighteen hand ganpati story in Ratnagiri But due to the temple is currently closed for public viewing

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या 170 किलोमीटरच्या किनारपट्टी भागात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला वर्षानुवर्षांचा इतिहास लाभलेला आहे. त्यातील एक मंदिर म्हणजे रत्नागिरीतील प्रतिष्ठित असे अठरा हाताच्या गणतीपचे होय. संकष्टी, अंगारकीसह, गणेश चतुर्थी, माघी गणेशोत्सवासह दर मंगळवारी दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात. अठरा हात हे या गणतीपचे वेगळेपणं आहे. अशा या रत्नागिरीतील प्रसिध्द अशा अठरा हाताच्या गणतीपची आख्यायिका जाणून घेऊयात....!


रत्नागिरीतील गाडीतळ येथे राहणारे कै. विनायक कृष्णाजी जोशी हे पोस्टात नोकरीला होते. त्यांची बदली राजापूरला झाली. कोटा संस्थानात राहणारे अच्युतानंदतीर्थस्वामी हे राजापूरला येत असत. एकदा या स्वामींच्या दर्शनाला विनायक जोशी गेले. त्यांच्या ते प्रवचनाला बसले. स्वामींनी विनायक जोशी यांना तू प्रत्यक्ष गणपती आहेस, तू माझ्याबरोबर चल असे सांगितले. जोशी यांना घेऊन अच्युतानंदतीर्थस्वामी पुढे रवाना झाले. त्यानंतर 1945-46 मधे पुन्हा अच्युतानंदतीर्थ स्वामी परत राजापूरला आले आणि त्यांनी जोशींना मंत्र दिला. तसेच चांगल्या स्थानी जाऊन तप कर असे सांगितले.

श्री. जोशी गणपतीपुळे येथे गेले आणि त्यांनी तेथे 21 दिवस तप केले. त्या काळात ते जेवले नाहीत. स्वामींनी दिलेल्या मंत्राचा जोशी यांनी जप केला, तेव्हा गणपतीच्या अंगावरील फुले यांच्या हातात येऊन पडली. त्यांनी 1948 नंतर 21 वर्षे जप केला. त्यानंतर त्यांना दृष्टांत झाला की आता तू माझी मूर्तीरूपाने प्रतिष्ठापना कर. त्याप्रमाणे 1966 मधे हे देऊळ बांधले व 1967 मध्ये ज्येष्ठ वद्य अष्टमीला स्थापना केली. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला जन्मोत्सव करतात. याच तिथीला कै. जोशी यांचा जन्म झाला होता. देवी व गणपतीचे रुप असलेला हा गणपती आहे. श्री अच्युतानंदतीर्थ यांनी देवीची उपासना करा अशी सुचना सर्वांना केली होती. फक्त जोशी यांनी गणपतीची उपासना केली. गणपतीची स्थापना केल्यानंतर गणपतीला अठरा हात होते, म्हणून अठरा वर्षे तप केले. शेवटी 21 दिवस काही न खाता पिता त्यांनी उपास केला आणि 1982 मध्ये त्यांनी देह ठेवला. 1981 ला या मंदिराला 25 वर्षे पूर्ण झाली.


फाटक हायस्कूलच्या जरा पुढे गेल्यावर हे मंदिर आहे. या मंदिराची व्यवस्था कै. विनायक जोशी यांना जगन्नाथ, महादेव, दत्तात्रय, पद्यनाभ, राधाकृष्ण, धुंडीराज असे सहा पुत्र आहेत. ते सर्व तेथेच राहतात. त्यांच्यापैकी कोणीही नियमित पूजाअर्चा करतात. त्यांच्यापैकी दोन ते तीन भाऊ कीर्तन करतात. गाभार्यांत कोणालाही जाऊ देत नाहीत. येथे दरवर्षी नाटक करतात, त्यात घरचेच लोक काम करतात. गणेशवाडीचे कीर्तनकार श्री. काणे हे उत्सवात कीर्तनासाठी गेली 21 वर्षे येत आहेत. डेरवण येथील विठ्ठलरावजी जोशी हे श्री अच्युतानंदतीर्थ यांचेच शिष्य होते.


गाभार्याथत चौथर्याजवर श्रीगणेशाची 60 सें.मी. रुंद आणि 60 सें.मी. उंचीची संगमरवरी 18 हातांची प्रसन्न मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर छत्र आहे. श्रीगणपतीचे डाव्या अंगाला संगमरवरी 30 सेंमी लांबीचा, पाठीवर अल कोरलेला आहे. या गणपतीला अठरा हात आहेत. सोळा हात देवीचे आणि दोन हात गणपतीचे मिळून अठरा हात आहेत. या मंदिरातील मूर्ती राजस्थानातून करून आणली. गाभार्यागबाहेर कोनाडयात शिवपिंडी व मारुतीची मूर्ती आहे.गेली अनेक वर्षे रत्नागिरीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण या मंदिरात दर्शनासाठी येतात; परंतु सध्या कोरोनातील टाळेबंदीमुळे हे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. पण मंदिर व्यवस्थापनामार्फत सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने पुजाअर्चा सुरु ठेवली आहे. पुजा झाल्यानंतर आरती होते आणि पुन्हा मंदिर बंद करण्यात येते.....


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com