esakal | विजयपूर रोड येथे 13 मूर्ती संकलन केंद्रांवर हजारो गणेशमूर्तींचे संकलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Idols

विजयपूर रोड मध्यवती गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मूर्ती संकलन केंद्रांवर हजारो मूर्तींचे संकलन करण्यात आले. याशिवाय अनेक भाविकांनी आपल्या परिवारासमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्ती विसर्जन केल्या. 

विजयपूर रोड येथे 13 मूर्ती संकलन केंद्रांवर हजारो गणेशमूर्तींचे संकलन 

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आज शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या संकलन केंद्रांवर हजारो मूर्तीचे संकलन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने विजयपूर रोड परिसरातील नागरिकांसाठी कोरोनाच्या संकटामुळे सामाजिक अंतर पाळून 13 केंद्रांवर मूर्ती संकलन करण्यात आले. 

मूर्ती संकलन करण्यासाठी बालाजी मंगल कार्यालय, कुसुमराज मंगल कार्यालय, कुबेर लक्ष्मी लॉन्स, पोस्ट बेसिक शाळा, वि. गु. शिवदारे महाविद्यालय, गोविंदश्री मंगल कार्यालय, समृद्धी गार्डन, संत तुकडोजी महाराज आश्रम प्रशाला, राजस्व नगर सांस्कृतिक भवन, किल्लेदार मंगल कार्यालय, रखुमाई मंगल कार्यालय, स्नेहपुष्प मंगल कार्यालय, मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन अशा तेरा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मूर्ती संकलन केंद्रांवर हजारो मूर्तींचे संकलन करण्यात आले. याशिवाय अनेक भाविकांनी आपल्या परिवारासमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्ती विसर्जन केल्या. 

शहराच्या झोन क्रमांक पाचमध्ये मूर्ती संकलन सुरळीत पार पडावे यासाठी महापालिका कर्मचारी व विजयपूर रोड मध्यवर्ती मंडळ, ओम गर्जना मंडळ यासाठी परिश्रम घेत होते. विजयपूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद गोटे यांनी सांगितले, की सकाळपासून शांततेत मूर्ती संकलन सुरू आहे. भाविकांनी शांततेत संकलन केंद्रावर मूर्ती प्रदान केल्या आहेत. कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय आजचा उत्सव व्यवस्थित पार पडला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल