esakal | होटगी रोड मध्यवर्ती मंडळाच्या मूर्ती संकलनाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
sakal

बोलून बातमी शोधा

Hotgi Road.

सकाळपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी या भागात मोठी लगबग बघायला मिळाली. गणपती "बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी बच्चेकंपनी, घरातील वडीलधारी मंडळी पारंपरिक पोशाखात सहभागी झाली होती. होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या 84 मंडळांनी यावर्षी गणरायाची स्थापना केली होती. 

होटगी रोड मध्यवर्ती मंडळाच्या मूर्ती संकलनाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : महापालिका विभागीय कार्यालय क्रमांक पाचच्या वतीने होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, जुळे सोलापूर, होटगी रोड व विजापूर रोड परिसरातील गणेश मूर्तींच्या संकलनासाठी बारा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. 

यामध्ये बालाजी मंगल कार्यालय, कुसुमाग्रज मंगल कार्यालय, कुबेर लक्ष्मी लॉन्स, पोस्ट बेसिक शाळा, व्ही. जी. शिवदारे महाविद्यालय, गोविंदश्री मंगल कार्यालय, समृद्धी गार्डन, राजस्व नगर संस्कृतिक भवन, किल्लेदार मंगल कार्यालय, सौ. रुखमाबाई मंगल कार्यालय, स्नेहपुष्प मंगल कार्यालय, मातोश्री सिद्धव्वाबाइ हत्तुरे सांस्कृतिक भवन या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जवळपास सर्व संकलन केंद्रांवर शंभरच्या आसपास मूर्तींचे संकलन करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालय क्रमांक पाचचे अधिकारी अलमेलकर यांनी दिली. 

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम म्हणाले, कोरोनाचे संकट टाळण्यासाठी व गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने यावर्षी चांगले नियोजन केले आहे. महापालिकेने गणेश भक्तांना मूर्ती संकलनाचे केलेले आवाहन जवळपास सर्व भक्तांनी अवलंबले आहे. सकाळपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी या भागात मोठी लगबग बघायला मिळाली. गणपती "बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी बच्चेकंपनी, घरातील वडीलधारी मंडळी पारंपरिक पोशाखात सहभागी झाली होती. होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या 84 मंडळांनी यावर्षी गणरायाची स्थापना केली होती. या परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती, घरगुती मूर्ती संकलन केंद्राच्या माध्यमातून संकलित करण्यात आल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल