esakal | गणरायची घरीच आरती करुन जवळच्या संकलन केंद्रावर गणेशमृर्ती देण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Instructions given by Tehsildar for immersion of Ganeshmurti in Akole taluka

नागरिक, गणेश मंडळ व भक्तगणास गणेश विसर्सनासाठी प्रशासनाने सूचना केल्या आहेत.

गणरायची घरीच आरती करुन जवळच्या संकलन केंद्रावर गणेशमृर्ती देण्याचे आवाहन

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : शहरातील नागरिक, गणेश मंडळ व भक्तगणास गणेश विसर्सनासाठी प्रशासनाने सूचना केल्या आहेत. आपल्या लाडक्या श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करताना गणरायाची आरती आपल्या घरीच करून नंतर श्रीगणरायाची मूर्ती विसर्जनासाठी नजीकच्या संकलन केंद्रावर देण्यात यावी, असं सांगण्यात आले आहे. 

अकोले नगर पंचायतच्या वतीने पाच ठिकाणी संकलन केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. महात्मा फुले चौक, नवले वाडी फाटा, अगस्ती कारखाना रोड, धुमाळवाडी, शेकेवाडी अशी संकल केंद्र असल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली. उपलब्ध केंद्रावरच शहरवासीयांनी गणरायाची मूर्ती चे संकलन करायचे आहे. कोणत्याही नागरिकाला नदी पात्रांमध्ये विसर्जनाची परवानगी देण्यात आलेली नाही. गैरकृत्य करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

काही सामाजिक संघटनांनी देखील फिरते विसर्जन हौद तयार केले आहेत. ते शहरात घरोघरी फिरवणार आहेत. त्याचा देखील आपण लाभ घेऊ शकता, असे कांबळे यांनी सांगितले आहे. कांबळे यांनी पुढे सांगितले की, काही सामाजिक संस्थांनी संकलन केंद्र सुरू केले आहे. येथे देखील आपण आपल्या गणरायाचे संकलन करू शकता. 

नदीपात्रामध्ये श्रीगणेश विसर्जनाची परवानगीसाठी मज्जाव करण्यात आला. पोलिस यंत्रणेचे बारीक लक्ष असणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिक नदीपात्राच्या आसपास आलेले अथवा आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्या जाणार आहे. प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी. 

गणेशोत्सव दरवर्षी येणार आहे. परंतु यावर्षीचा गणेशोत्सव आपणास आपले स्वतःचे आरोग्य सांभाळूनच करायचा आहे. आपणच आपले रक्षक आहात. कुठेही गर्दीत जाऊ नका, गर्दी टाळा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन आपल्या मंडपातच करून श्रीगणेश मूर्ती जवळच्या केंद्रावर संकलित करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर