esakal | नैवैद्य बाप्पाचा: गाजर मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

GAJARMODAK

साहित्य -

सारणासाठी - अडिचशे ग्रॅम केशरी गाजरे (कोवळी), अर्धा कप दूध, पाव कप खवा,  पाव कप साखर, पाव टीस्पून वेलचीपूड, थोडा सुकामेवा

आवरणासाठी - एक कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १ टीस्पून मैदा, १ टीस्पून तूप, मीठ चवीनुसार

नैवैद्य बाप्पाचा: गाजर मोदक

sakal_logo
By
सुजाता नेरुरकर

गाजर मोदक

साहित्य -

सारणासाठी - अडिचशे ग्रॅम केशरी गाजरे (कोवळी), अर्धा कप दूध, पाव कप खवा,  पाव कप साखर, पाव टीस्पून वेलचीपूड, थोडा सुकामेवा

आवरणासाठी - एक कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १ टीस्पून मैदा, १ टीस्पून तूप, मीठ चवीनुसार

कृती -

सारण - गाजरे स्वच्छ धुवून, सोलून किसून घ्यावीत. एका कढईत किसलेले गाजर, दूध व साखर मिक्स करुन थोडे घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. त्यामध्ये खवा घालून मिक्स करुन २ मिनिटे परत गरम करुन घ्यावे. नंतर त्यामध्ये वेलची पूड व सुकामेव्याचे तुकडे घालून मिश्रण तयार करावे

आवरण - एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये मीठ व तेल घालून पाण्याला उकळी आणावी. त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा मिक्स करुन हलवून भांड्यावर झाकण ठेवावे व २ मिनिटे त्याला वाफ येऊ द्यावी. नंतर शिजलेले पीठ परातीत काढून ओल्या हाताने चांगले मळून घ्यावे. त्याचे लिंबाएवढे गोळे करुन हातावर पुरीसारखे थापून त्यामध्ये एक चमचा सारणाचे मिश्रण ठेऊन पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व मोदक तयार करुन घ्यावेत. मोदक पात्रात पाणी गरम करुन घ्यावे. मोदक पात्राच्या चाळणीवर एक केळीचे पान ठेऊन त्यावर पाणी शिंपडून सर्व मोदक लावून घ्यावेत. परत मोदकावरती एक केळीचे पान ठेऊन मोदकपात्राचे झाकण घट्ट लावून १५ मिनिटे मोदक उकडून घ्यावेत. गर गरम मोदक साजूक तूप घालून सर्व्ह करावेत.