esakal | नैवैद्य बाप्पाचा: गुलकंदाचे मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

Gulkand_Modak

साहित्य - एक वाटी रवा, एक वाटी मैदा, मोहनासाठी पाव वाटी तेल किंवा तूप, पुरेसे दूध, दोन वाट्या तयार गुलकंद, अर्धी वाटी काजू व बदाम यांचे तुकडे, तळणीसाठी तूप अथवा रिफाईंड तेल.

नैवैद्य बाप्पाचा: गुलकंदाचे मोदक

sakal_logo
By
सुप्रिया खासनीस

साहित्य - एक वाटी रवा, एक वाटी मैदा, मोहनासाठी पाव वाटी तेल किंवा तूप, पुरेसे दूध, दोन वाट्या तयार गुलकंद, अर्धी वाटी काजू व बदाम यांचे तुकडे, तळणीसाठी तूप अथवा रिफाईंड तेल.

कृती - तेल अथवा तूप गरम करुन रवा मैदा यात घालावे. ते एकसारखे कालवावे. नंतर दूध घालून रवा मैदा घट्ट भिजवावा. गुलकंदामध्ये काजू व बदाम यांचे बारीक तुकडे घालून सारण एकसारखे तयार करावे. रवा व मैदा चांगला दोन तास तरी भिजायला हवा. नंतर चांगले कुटू  त्याच्या गोळ्या कराव्यात. गोळ्यांच्या पुऱ्या लाटून (पारी) त्याला मोदकाचा आकार देऊन त्या वाटीत सारण भरावे व मोदकाच्या मुखऱ्या बंद करुन मोदक मंद आचेवर तळावेत. गुलकंदामुळे मोदकांना सुंदर स्वाद येतो.