
Beed: मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्यामुळे जिल्हा परिषदेत ‘मनाला वाट्टेल तेव्हा’ ये-जा करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. त्यांनी कार्यालय वेळ असलेल्या सकाळी ९ : ४५ ते ६ : १५ या वेळेत कर्तव्यावर हजर राहणे बंधनकारक केले आहे. उशिरा येणाऱ्यांना त्यांनी थेट नोटीसा बजावल्या असून यात विभाग प्रमुखांचाही समावेश आहे.
एकूण १६ विभाग आणि तब्बल १३०० गावांतील नागरिकांशी थेट संबंध असलेली जिल्हा परिषद ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था मानली जाते. आरोग्य, शिक्षण, पाणी, बांधकाम, जलसंधारण, समाज कल्याण, महिला व बालविकास अशा महत्वाच्या १६ विभागांचा समावेश असलेल्या जिल्हा परिषदेची बीड पासून गावापर्यंतची आस्थापना तब्बल १२ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे.