Ganesh Festival 2025Sakal
Ganesh Chaturti Festival
Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात गोंगाट नको, जल्लोष हवा; ‘डीजे’ टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन
Festival Responsibility : गणेशोत्सवाच्या नावाखाली डीजेच्या दणदणाटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, सणांच्या गोंगाटाला नाही म्हणण्याची वेळ आली आहे.
पिंपरी : घरकुल परिसरात ‘डीजे’च्या आवाजामुळे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. ‘डीजे’च्या दणदणाटाबाबत सर्वसामान्य नागरिकांनी त्रागा व्यक्त केला, तरी काही अतिउत्साही मंडळे आणि प्रशासनाकडून ‘डीजे’वापराबाबतचे नियम पाळले जात नाहीत, असा आरोप होतो. त्यामुळे पोलिस प्रशासन ‘डीजे’च्या आवाजावर नियंत्रण ठेवणार का?, गणेशोत्सव मंडळे सामाजिक भान ठेऊन पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘‘गणेशोत्सवात गोंगाट नको, जल्लोष हवा’’ असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.