पुणे - राज्य शासनाने या गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान एकुण ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केला आहे.