esakal | नैवैद्य बाप्पाचा: पनीरचे उकडीचे मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

Paneer Modak

साहित्य: सारणासाठी - दोन कप पनीरचे बारीक तुकडे, १ छोटा कांदा, अर्धा टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरुन) पाव कप कोथिंबीर (चिरून), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लिंबू रस

नैवैद्य बाप्पाचा: पनीरचे उकडीचे मोदक

sakal_logo
By
सुजाता नेरुरकर

साहित्य: सारणासाठी - दोन कप पनीरचे बारीक तुकडे, १ छोटा कांदा, अर्धा टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरुन) पाव कप कोथिंबीर (चिरून), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लिंबू रस

आवरणासाठी - दोन कप तांदळाचे पीठ (आंबेमोहोर), २ कप पाणी, २ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून मैदा, मीठ चवीनुसार

कृती- एका कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये हिंग, कांदा, आले-लसूण व हिरवी मिरची घालून थोडे परतून घ्यावे. त्यामध्ये मीठ-पनीरचे तुकडे,  कोथिंबीर व लिंबू रस घालून मिश्रण मिक्स करुन घ्यावे. पातेल्यात २ कप पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये मीठ व तेल करुन त्यावर झाकण ठेवावे. चांगली वाफ आल्यावर पीठ परातीत काढून थंड पाण्याचा वापर करुन पीठ खूप मळून घ्यावे. नंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करुन हातावर थापून त्याची पुरी करावी व त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण भरावे. पुरी बंद करुन मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व मोदक करुन घ्यावे. मोदकपात्रामध्ये पाणी चांगले गरम करुन त्यावरती चाळणी ठेऊन त्यात केळीचे पान ठेवावे. पानावर जेवढे मोदक बसतील तेवढे ठेऊन वरती परत केळीचे पान ठेवावे. मोदकपात्राचे झाकण लावून घ्यावे. १०-१२ मिनिटे मोदक उकडून घ्यावे. गरम गरम छान लागतात.

go to top