esakal | नैवैद्य बाप्पाचा: बिनसाखरेचा मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarless_Modak

साहित्य: 

आवरणासाठी - एक कप तांदळाचे पीठ, १ कप पाणि, १ टीस्पून मैदा, १ टीस्पून तूप, मीठ चवीनुसार

नैवैद्य बाप्पाचा: बिनसाखरेचा मोदक

sakal_logo
By
उमाशशी भालेराव

साहित्य: 

आवरणासाठी - एक कप तांदळाचे पीठ, १ कप पाणि, १ टीस्पून मैदा, १ टीस्पून तूप, मीठ चवीनुसार

सारणासाठी - १५-२० खजूर (बिया काढून) १० ते १२ सुके अंजीर, थोड्या मनुका, वेलची पूड

कृती - खजूर अंजिराचे बारीक तुकडे करुन घ्यावेत. मनुकांसह मिक्सरमधून एकजीव करुन घ्यावे. थोडी वेलचीपूड घालावी.

एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये मीठ व तेल घालून पाण्याला उकळी आणावी. त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा मिक्स करुन हलवून भांड्यावर झाकण ठेवावे व २ मिनिटे त्याला वाफ येऊ द्यावी. नंतर शिजलेले पीठ परातीत काढून ओल्या हाताने चांगले मळून घ्यावे. त्याचे लिंबाएवढे गोळे करुन हातावर पुरीसारखे थापावेत.

खजुर-अंजिर- मनुका यांचे तयार झालेले सारण भरून उकडीचे मोदक बनवावेत (गरज भासल्यास शुगर फ्री मिसळून अधिक गोडी आणता येईल.

go to top