esakal | अरे व्वा 41 गावात एक गाव एक गणपती 
sakal

बोलून बातमी शोधा

अरे व्वा 41 गावात एक गाव एक गणपती 

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात 41 गावांमध्ये एक गाव ,एक गणपती ही मोहिम राबविल्याने सामाजिक अंतर ठेवीत धार्मिक सण, उत्सव राबविन्यास पोलीस प्रशासनाचा सहभाग महत्वपूर्ण ठरत आहे.

अरे व्वा 41 गावात एक गाव एक गणपती 

sakal_logo
By
प्रा.हिरालाल पाटील

कळमसरे ता.अमळनेर ः सर्वत्र कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असल्याने सध्यस्तितित सण, उत्सव साजरे करताना मर्यादा येत आहेत.मात्र विविध उपाययोजना आणि सावधगिरी व पोलीस प्रशासनाची योग्य जबाबदारी आणि जनजागृतीने अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात 41 गावांमध्ये एक गाव ,एक गणपती ही मोहिम राबविल्याने सामाजिक अंतर ठेवीत धार्मिक सण, उत्सव राबविन्यास पोलीस प्रशासनाचा सहभाग महत्वपूर्ण ठरत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.


तालुक्यात अमळनेर पोलीस ठाणे आणि मारवड पोलीस ठाणे यात एकूण 152 गावे येतात त्यात अमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत 92 गावे तर मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत 60 येतात. गणेश उत्सवाच्या पाश्वभूमिवर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,मारवड़ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी तालुक्यातील सर्व गणेश मंडळाना जनजागृती करीत शासनाच्या आदेशानुसार गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पंधरा दिवसाअगोदर पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले होते.

या गावात आहेत एक गाव एक गणपती
अमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत - खेडी खुर्द ,दापोरी खुर्द व मुंगसे, कोंढावळ ,सावखेडा, रढावण,गंगापुरी,मठगव्हाण ,बिलखेडा, रामेश्वर,देवळी, कन्हेरे,ढेकु सिम,खवशी,धावडे, रामेश्वर खुर्द,बिलवाड़ी खुर्द,रामेश्वर खुर्द, देवगांव देवळी,खोकरपाट, मांजर्डी,कुऱ्हेसिम , दापोरी,रणाईचे,एकरुखी,पातोंडा,टाकरखेडा,निमझरी, अंबासन, कावपिंप्री, इंदापिंप्री, धुपी, सुंदरपट्टी असे एकूण 31 गावांचा सहभाग यात पोलीस बंदोबस्तसाठी  05 पोलीस अधिकारी, 45 पोलीस कर्मचारी, 30 होमगार्ड,  1 आर सी पी , 1 स्ट्रकिंग फोर्स असून यात या पोलीस ठाण्याअंतर्गत 62 सार्वजनिक गणपती मंडळानी सहभाग घेतला आहे.

मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत एक गाव एक गणपती असलेली गावे--यात एकूण 60 गावे मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत येतात यातील दहा(10) गावे-अंतुर्ली,शहापुर,गोवर्धन, झाडी, लोणचारम,रंजाणे, हिंगोणे खुर्द,कलाली,मालपुर,हिंगोणे बुदृक, यांनी एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आली आहे. तर एकूण 37 सार्वजनिक मंडळानी सहभाग घेतला आहे.या पोलीस ठाण्याअंर्तगत 1 पोलीस अधिकारी, 20 पोलीस कर्मचारी, 21 होमगार्ड यांचा बंदोबस्त सुरु आहे.

मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत मूर्ती संकलन करुण करणार सामायिक विसर्जन
येथील सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील गणेश विसर्जनासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गणेश मूर्तिंचे संकलन करून त्यांचे विसर्जन पोलीस ठाण्याअंतर्गत करणार असल्याचे सांगितले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

go to top