टेंभूत गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम; गावावर राहणार 'सीसीटीव्ही'ची नजर

टेंभूत गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम; गावावर राहणार 'सीसीटीव्ही'ची नजर

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कोरोनाच्या संकटाने सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा आल्या असल्या, तरी माणुसकीचे दर्शन अनेक ठिकाणी पाहायला मिळते. टेंभू गावाने कोरोना आटोक्‍यात ठेवण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उत्सवासाठी जमणाऱ्या वर्गणीतून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 

तालुक्‍यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. त्यातच गणेश उत्सव सुरू आहे. या उत्सवावेळी कोरोना वाढू नये, याकरिता प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. पोलिसांनी सर्वच गावांना "एक गाव, एक गणपती'ची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत कोरोना रोखण्यासाठी टेंभूमधील ग्रामस्थ व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात सामाजिक अंतर राखून "एक गाव, एक गणपती' उपक्रमासाठी बैठक घेण्यात आली. या वेळी सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय झाला. 

पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नवजवान, जोतिर्लिंग, गणराज, शिवशक्ती, शिवसंग्राम, आगरकर, हिंदवी स्वराज्य, संत रोहिदास, आगरकरनगर, कला, समृध्दी, राजमुद्रा, श्री गणेश या सर्व गणेश मंडळांनी गाव व परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे ठरवले आहे. यावेळी सरपंच युवराज भोईटे, उपसरपंच सुहास महाडिक, पोलिस पाटील रुबिना मुलाणी, एम. यू. लावंड तसेच ग्रामपंचायत सदस्य, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com