esakal | ...म्हणून गणपतीला हराळीचा मान
sakal

बोलून बातमी शोधा

harali durva

बाप्पांना हराळी अत्यंत प्रिय आहे. बाप्पाच्या पूजनाच्या साहित्यामध्ये हराळीचा समावेश अतिशय महत्वाचा आहे. २१ हराळीची जुडी बाप्पाला वाहिली जाते.

...म्हणून गणपतीला हराळीचा मान

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : श्री गणेश अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा. मी लहानपणापासून ऐकत आणि पाहत आली आहे. श्री गणेश चतुर्थी, गणेशॊत्सव सुरु झाले कि बाप्पाच्या दर्शनाला जाताना प्रत्येक भक्त हराळी घेऊनच बाप्पाचा दर्शन घेतो. म्हणजेच कधीही गणपतीची पूजा करताना न विसरता बाप्पाला हराळी चढवली जाते. ती ही बाप्पाला २१ हराळी मोजूनच ठेवण्याचा मान आहे. पण मला लहानपणापासून नेहमीच प्रश्न पडायचा की, बाप्पाला हराळी का वाहिली जाते, बाप्पाला इतका जास्त हराळीचा मान का आहे, त्याच्या मागे काय कहाणी आहे. असाच हा प्रश्न अनेकांना पडला असेल, बरोबर ना...? चला तर मग बाप्पाला हराळी का आवडते ते जाणून घेऊयात...  

गणपतीला हराळी वाहतात, यामागे एक आख्यायिका मी गणेश कथेत वाचलेली आहे. एके दिवशी ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. तो राक्षस देवतांना खूप त्रास देऊ लागला. त्यावेळी देवतांच्या विनंतीनंतर बाप्पांने त्या असूराला गिळून टाकले. त्या असुराला गिळल्यामुळे बाप्पाच्या पोटात जळजळ होऊ लागले. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार (हराळी) दुर्वांच्या जुड्या बाप्पाच्या मस्तकावर  ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी हराळीच्या २१ जुडी बाप्पाला खाण्यास दिली. त्यावेळी लगेच खूप प्रयत्न केल्यानंतरही बाप्पाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. बाप्पाच्या पोटातील जळजळ कमी झाल्यामुळे यापुढे मला हराळी अर्पण करणाऱ्यास हजारो व्रते, दान केल्याचे पुण्य मिळेल, असे बाप्पा म्हणाले, म्हणून गणपतीला हराळी वाहिल्या जातात.

बाप्पांना हराळी अत्यंत प्रिय आहे. बाप्पाच्या पूजनाच्या साहित्यामध्ये हराळीचा समावेश अतिशय महत्वाचा आहे. २१ हराळीची जुडी बाप्पाला वाहिली जाते. ही हराळी आपल्याला सहज सर्वत्र मिळते. आपल्या आजूबाजूच्या बागेत, गार्डनमध्ये या दिवसात सहजच उपलब्ध होते. सर्वजण बाप्पाच्या दर्शनावेळी न चुकता हराळी खरेदी करतातच. बाप्पाला हराळी खूपच प्रिय असल्याकारणाने नेहमीच बाप्पाच्या दर्शनाला जाताना हराळी वाहिली जाते.

go to top