पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महामेट्रोतर्फे शनिवारी (ता. ६) सकाळपासून रविवारी (ता. ७) रात्री ११ पर्यंत सलग ४१ तास मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वनाज - रामवाडी आणि पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गावर मेट्रोच्या एकूण १३९० फेऱ्या होणार आहेत. पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गावर दर तीन मिनिटांनी मेट्रो सोडण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे.