' सत्यम' ने गणेशोत्सवातील 11,111 रुपयांचा निधी दिला सकाळ रिलीफ फंडाला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

शहरातील गणेशाेत्सव मंडळांनी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन पूरग्रस्तांना मदत करण्याचे निश्चित केले आहे. सत्यम क्रीडा, सांस्कृतिक मंडळाने सकाळ रिलीफ फंडाला निधी देऊन सामाजिक भान जपले आहे.

सातारा ः पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरू आहे. विविध क्षेत्रातील नागरिक, संस्थांनी धनादेश आणि रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा कार्यालयात मदत जमा केली आहे. सदरबझारमधील सत्यम क्रीडा, सांस्कृतिक मंडळाने आपला गणेशोत्सवातील खर्च कमी करून 11 हजार 111 रुपयांचा निधी सकाळ रिलीफ फंडाला देऊन सामाजिक भान जपले आहे.

उत्सवाची सर्व धुरा महिला सांभाळतात, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या अध्यक्षा प्रा. आसावरी शिंदे-कदम, कार्याध्यक्षा विद्या देसाई, उपाध्यक्षा नीता चौगुले, सचिव देवयानी शिंदे, खजिनदार हंसा परमार, नीलम चोटालिया, ज्येष्ठ सदस्य ऍड. जयप्रकाश येवले आणि सदस्य या वेळी उपस्थित होते. 

सत्यम क्रीडा-सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रा. आसावरी शिंदे-कदम यांच्याकडून  "सकाळ'चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर व वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी निधीचा धनादेश स्विकारला. त्यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित हाेते. 

कृष्णानगर (सातारा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून 10 हजार 11 रुपयांचा निधी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या उपस्थितीत सकाळ रिलीफ फंडाकडे सुपूर्द केला. शालेय समितीचे पदाधिकारी व निवृत्त उपजिल्हाधिकारी सुधाकर करपे यांच्यासह मुख्याध्यापिका सुनंदा गोसावी, शिक्षक माधुरी घनवट, राजकुमार जाधव, सुशीला डायस, सुनंदा जाधव, प्रकाश बडदरे, सुरेश मगर, वैशाली गायकवाड, हेमा ढाणे, शोभा जाधव, परवीन काझी, संगीता बर्गे, गजानन धुमाळ, मनीषा म्हेत्रे, विजया महाडिक, अर्चना करे, विजय लोहार यांनी या रकमेत आपला खारीचा वाटा उचलला. 

याशिवाय पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे निधी देणाऱ्यांची नावे अशी ः यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (ज्युनिअर) कॉलेज, सातारा (25,836), माधुरी टंकसाळे, सदाशिव पेठ, सातारा (1000), मेघदूत सहकारी भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कोडोली, सातारा (5000), चि. प्रथमेश महेश जोशी व बी. डी. जोशी, शाहूपुरी, सातारा (5000), जसपाल भगत व दिलीप चव्हाण, हिंदूस्थान फिडस्‌ मॅन्यू. कंपनी (कामगारांच्या वतीने), सातारा (5000), राजेंद्र हणमंतराव साळुंखे, कोरेगाव (2001), नवचैतन्य हायस्कूल, गोंदवले बुद्रुक (2500). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: `Satyam` gave for Rs 11,111 of Ganeshotsav to Sakal Relief Fund