गणेशोत्सव2019 : गणेशाची रूपे पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

सर्वांचे लाडके दैवत असणाऱ्या गणेशाची विविध रूपे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत पुण्यात गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन विविध भागांत भरविले आहे.

गणेशोत्सव2019 : पुणे - सर्वांचे लाडके दैवत असणाऱ्या गणेशाची विविध रूपे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत पुण्यात गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन विविध भागांत भरविले आहे. 

कर्वे रस्त्यावरील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात दिनकर जाधव, संजय टिक्कल, विवेक निंबाळकर, सोमनाथ बोथे, नवनाथ क्षीरसागर यांनी काढलेली गणपतीची मूर्त आणि अमूर्त रूपांतील चित्रे पाहता येतील. मुंबईतील चित्रकार शुभांगी गाडे यांनीही गणपती, पार्वती-गणेश, तसेच अमूर्त शैलीतील गणपती साकारले असून, त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन औंधमधील वेस्टंड सेंटर वन मॉलमधील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात सुरू आहे. 

सातारा रस्त्यावरील वाळवेकर नगरजवळील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात विश्वनाथ खिलारे यांच्या गणपतींच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. ही प्रदर्शने १५ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वांना विनामूल्य पाहता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा