गणेशोत्सव2019 : सांस्कृतिक, सामाजिक वारसा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

श्री साई मित्र मंडळ आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली २५ वर्षे गणरायाचा उत्सव साजरा केला जात आहे. जनमानसाला प्रोत्साहन, व्यासपीठ तर कठीण प्रसंगी मदत आणि धीर देण्याचा प्रयत्नही प्रतिष्ठान करत आले आहे.

गणेशोत्सव2019 : पुणे - श्री साई मित्र मंडळ आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली २५ वर्षे गणरायाचा उत्सव साजरा केला जात आहे. जनमानसाला प्रोत्साहन, व्यासपीठ तर कठीण प्रसंगी मदत आणि धीर देण्याचा प्रयत्नही प्रतिष्ठान करत आले आहे.

रुग्णसेवेकरिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णवाहिका देण्यात आली आहे. दरवर्षी आरोग्यतपासणी; तसेच महिलांकरिता विशेष शिबिर सुरू केले आहे.

योगदिनी योग शिबिराचे आयोजन करण्यात येते. रक्तदान शिबिरात एका दिवसात तब्बल एक हजार २६८ बाटल्या रक्तसंकलन करून राज्य सरकारकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रतिष्ठानने पटकावला आहे. राज्याच्या मातीतल्या कुस्तीगीरांसाठी कुस्तीचं आंतरराष्ट्रीय मैदान उपलब्ध करून दिलं. ज्यात तुर्कस्तानचे मल्लदेखील सहभागी झाले होते. मल्लखांब खेळास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा घेण्यात आली. पुण्यातील मानाचा ‘महापौर चषक स्पर्धा’ घेण्याचा बहुमानदेखील प्रतिष्ठानला प्राप्त झाला आहे. ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सव’ आता पुणेकर रसिकांसाठी मुकूटमणी ठरलाय. महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना नगर जिल्ह्यातील गिरवली हे गाव दत्तक घेऊन तेथील लोकांना सहा महिने पुरेल इतके धान्य, चारा आणि इतर मदतीसाठी रोख रकमेची मदत केली आहे. सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांनादेखील मदतीचा हात देण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Decoration