गणेशोत्सव2019 : देहूत आकर्षक रथ ठरले लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

फटाक्‍यांची आतषबाजी, ढोलपथकांच्या निनादात देहू आणि देहूरोड परिसरातील गणेशोत्सवाची गुरुवारी सांगता झाली. स्वच्छतेला प्राधान्य देत अनेक सार्वजनिक मंडळांनी निर्माल्य इंद्रायणी नदीत टाकले नाही. देहू ग्रामपंचायत, रोटरी क्‍लब देहू आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे कार्यकर्ते निर्माल्य संकलित करीत होते. यंदा प्रथम सार्वजनिक मंडळांनी गुलाल आणि भंडाराविरहित मिरवणूक काढली.

देहू - फटाक्‍यांची आतषबाजी, ढोलपथकांच्या निनादात देहू आणि देहूरोड परिसरातील गणेशोत्सवाची गुरुवारी सांगता झाली. स्वच्छतेला प्राधान्य देत अनेक सार्वजनिक मंडळांनी निर्माल्य इंद्रायणी नदीत टाकले नाही. देहू ग्रामपंचायत, रोटरी क्‍लब देहू आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे कार्यकर्ते निर्माल्य संकलित करीत होते. यंदा प्रथम सार्वजनिक मंडळांनी गुलाल आणि भंडाराविरहित मिरवणूक काढली.

इंद्रायणी नदीकाठी सकाळपासून घरगुती गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन सुरू होते. रात्री आठ वाजता देहू ग्रामपंचायतीपासून विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. सर्वच मंडळांनी डीजे आणि ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकीस सुरवात केली. फुलांनी सजवलेले रथ लक्षवेधी होते. विठ्ठलवाडीतील ओंकार मित्र मंडळ, संत तुकाराम महाराज, हनुमान मित्र मंडळ, शिरीषकुमार मित्र मंडळ आणि मानाचा नवशा गणपती मित्र मंडळ सहभागी झाले होते. यंदाच्या मिरवणुकीत सर्वच मंडळांनी डीजेचा वापर केला होता. गजानन बोट क्‍लबच्या वतीने बोटीच्या साह्याने अनेकांनी गणपतीचे विसर्जन केले.

देहूरोड बाजारपेठेत सुदर्शन मित्र मंडळ, अखिल महात्मा फुले भाजी मंडई, त्रिशुल मित्र मंडळ, नवशक्ती चैतन्य मित्र मंडळ, बंधुता मित्र मंडळाने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. देहूरोड पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त 
ठेवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Dehu