गणेशोत्सव2019 : ‘डीजे’चा आवाज बसला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

३ हजार १९३ पुण्यातील मंडळे 
२००० सिस्टीम लावणारी मंडळे
१ लाख + पूर्वीचा डीजेचा खर्च 
२० ते ७० हजार आता डीजेचा खर्च 
६०० डीजे व्यावसायिक

गणेशोत्सव2019 : पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’च्या तालावर तरुणाई जल्लोषात बेभान होऊन नाचते. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे ‘डीजे’चा आवाज तर बसलाच आहे; पण पूर्वी लाखो रुपयांच्या सुपाऱ्या घेणारे व्यावसायिक आता काही हजारांमध्ये गणपतीत डीजे वाजवत आहेत. 

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी नियमानुसार शांतता क्षेत्रात ४० ते ५० आणि रहिवासी क्षेत्रात ४५ ते ५५ डेसिबल आवाज असला पाहिजे. मात्र, साउंड सिस्टिममुळे आवाज १०० डेसिबलच्या पुढे जातो. त्यामुळे उच्च न्यायालयाने आवाजावर मर्यादा आणल्या. त्यामुळे दोन टॉप दोन 
बेसच लावायची परवानगी दिली जाते. त्यातच पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी सहानंतर पोलिस डीजे वाजवू न देता मंडळांना तसेच पुढे जायला भाग पाडत असल्याने मंडळांचा हिरमोड होतो. 

साउंड अँड इलेक्‍ट्रिक जनरेटर असोसिएशन ऑफ पुणेचे बबलू रमझानी म्हणाले, ‘‘न्यायालयाचा आदेश येण्यापूर्वी विसर्जन मिरवणुकीसाठी लाखांमध्ये पैसे मिळत होते. खूप चांगली सिस्टिम लावली तरी जास्तीत जास्त ७० हजार रुपये मिळतात. इतर राज्यांतून येणाऱ्या साउंड सिस्टिमला एक ते दीड लाख रुपये मिळतात.’’ 

क्रेझ ऑडिओ पुणेचे तुषार साळुंके म्हणाले, ‘‘आम्ही परदेशांतून सिस्टिम मागवली आहे, पण स्थानिक होम मेड साउंड सिस्टिम नियमांचे उल्लंघन करून एका बेसमध्ये अनेक साउंड लावतात. त्याचा फटका बसला आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan DJ System Close