गणेशोत्सव2019 : विसर्जन मिरवणुकीमुळे मध्य वस्तीतील रस्ते बंद

Miravnuk-and-Visarjan-Route
Miravnuk-and-Visarjan-Route

वाहतुकीसाठी रिंगरोड; पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन 
पुणे - अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिंगरोड तयार केला आहे. नागरिकांनी पर्यायी रस्ते वापरावेत; तसेच मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची ठिकाणेही निश्‍चित केली आहेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे. 

वाहतुकीसाठी बंद असलेला रस्ता व बंद होण्याची वेळ 
शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्‍शन ते जेधे चौक - सकाळी 7 
लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौकी ते टिळक चौक - सकाळी 7 
बाजीराव रस्ता - बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक - दुपारी 12 
बगाडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद - सकाळी 9 
कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक - दुपारी 12 
गणेश रस्ता - दारूवाला पूल ते जिजामाता चौक - सकाळी 10 
केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक - सकाळी 10 
गुरू नानक रस्ता - देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक - सकाळी 9 
टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक - सकाळी 9 
शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक - दुपारी 12 
जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4 
कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक - दुपारी 4 
फग्युर्सन रस्ता - खंडुजीबाबा चौक ते फग्युर्सन कॉलेज मुख्य प्रवेशद्वार - दुपारी 4 
भांडारकर रस्ता - पी. वाय. सी. जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक - दुपारी 4 
पुणे-सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक - दुपारी 4 
सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक - दुपारी 4 
प्रभात रस्ता - डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक - दुपारी 4 

येथे करावी पार्किंग 
एचव्ही देसाई कॉलेज (शनिवार पेठ), पुलाची वाडी नदीकिनारी, पुरम चौक ते हॉटेल विश्वदरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, कॉंग्रेस भवन मनपा रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग 
(नारायण पेठ) 

वेबसाइटवर मिळणार अपडेट 
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणता रस्ता सुरू आहे, कोणता बंद हे घरातून बाहेर पडल्यानंतर लक्षात ठेवणे शक्‍य नसते; पण आपल्या मोबाईलवरून याचे अपडेट मिळू शकतात. वाहतूक पोलिसांनी https://www.punetrafwatch.com ही वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर सर्व अपडेट असणार आहेत. पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असताना, या वेबसाइटची चाचपणी केली होती. त्याचा नागरिकांना उपयोग झाल्याने आता गणेशोत्सवातही ती अपडेट केली जाणार आहे, असे उपायुक्त देशमुख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com