आटपाडी तालुक्यातील बनपुरीच्या गणेशमूर्तींना पंजाबमधून मागणी

नागेश गायकवाड
Friday, 30 August 2019

आटपाडी - बनपुरी (ता. आटपाडी) येथील संतोष माने यांनी बनवलेल्या गणेशमूर्तींना पंजाबमधून मागणी आली आहे. तालुक्‍यात तयार झालेल्या गणेशमूर्ती यावर्षी पहिल्यांदाच राज्याबाहेर गेल्या आहे. 

आटपाडी - बनपुरी (ता. आटपाडी) येथील संतोष माने यांनी बनवलेल्या गणेशमूर्तींना पंजाबमधून मागणी आली आहे. तालुक्‍यात तयार झालेल्या गणेशमूर्ती यावर्षी पहिल्यांदाच राज्याबाहेर गेल्या आहे. 

संतोष सहा वर्षापासून श्री गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय करीत आहे. त्याअगोदर त्यांनी दोन वर्षे एका मूर्तिकाराकडे काम केले. तेथे मूर्ती बनवण्याचे कौशल्य आत्मसात करून स्वतः बनपुरीत मूर्ती बनवणे सुरू केले. सहा वर्षे ते आटपाडी तालुक्‍यासह भिवघाट, खानापूर, विटा, तासगाव या भागात मूर्ती पाठवत होते. गेल्यावर्षी त्यांच्या संपर्कात या भागातील गलाई बांधव आले होते. पंजाबमध्ये गलाईबांधव मोठ्या धामधुमीत गणेशोत्सव करतात. त्यांनी थेट पंजाबला मूर्ती पाठवण्याची विनंती संतोषला केली. 

मूर्ती पंजाबला नुकत्याच रवाना झाल्या. आठ इंचापासून दोन फूट उंचीपर्यंतच्या ३०० मूर्ती, तर सहा फूट उंचीच्या ५० मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश सर्वच मूर्ती प्लॉस्टर ऑफ पॉरिसमध्ये बनवल्या आहेत. या मूर्ती अत्यंत सुबक, देखण्या आहेत. पंजाबमध्ये मूर्ती पाठवताना विशेष पॅकिंगकडे लक्ष दिले आहे. मोठ्या बॉक्‍समध्ये छोटे दोन गणपती पाठवले आहेत. पॅकींगसाठी विशेष थर्माकोलचे आवरण केले आहे. या साडेतीनशे मूर्ती टेम्पो भरून रवाना केल्या आहेत.

सहा वर्षे गणेश मूर्ती तयार करतो. यावर्षी पहिल्यांदाच बनपुरीतून थेट पंजाबला गणेशमूर्ती पाठवल्या. त्याचा आनंद आणि समाधान वेगळे आहे.
- संतोष माने,
मूर्तीकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Ganesh idols of Banpuri in Attapadi taluka