गणेशोत्सव2019 : दिव्यांगांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

गणेशोत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे तसाच अंध, दिव्यांगांच्याही जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंज’ (एनएडब्ल्यूपीसी)तर्फे अशा विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘एनएडब्ल्यूपीसी’च्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत भावपूर्ण वातावरणात गणरायास निरोप दिला.

गणेशोत्सव2019 : पुणे - गणेशोत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे तसाच अंध, दिव्यांगांच्याही जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंज’ (एनएडब्ल्यूपीसी)तर्फे अशा विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘एनएडब्ल्यूपीसी’च्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत भावपूर्ण वातावरणात गणरायास निरोप दिला.

गणेशोत्सवात संस्थेचे विद्यार्थी दररोज गणेशाची आरती करतात, विविध कलांचे सादरीकरण करतात. या वेळी त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. गणेशोत्सवाची सांगता गणरायाच्या महाआरतीने आणि गणेश विसर्जन मिरवणुकीने होते. या मिरवणुकीत अंध विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वतः ढोल-ताशा वादन करतात, त्याच्या तालावर नृत्य करतात. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे हे विद्यार्थी गरीब कुटुंबांतील असून, त्यांच्यासाठी संस्था गणेशोत्सवाचे आयोजन करत असते. विसर्जन मिरवणुकीतही हे विद्यार्थी भाग घेतात. या वर्षी ही मिरवणूक चार तास चालली. मिरवणुकीसाठी स. प. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. गणेशोत्सवाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल देशपांडे यांनी केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Visarjan Handicapped Student