'क्लबचर'ने साकारली 'बाप्पा मोरया' शॉर्टफिल्म

टीम ईसकाळ
Saturday, 7 September 2019

पुणे : सध्या सगळीकडेच गणपतीची धामधूम सुरू आहे. सगळेच आपापल्या परीने गणरायाची सेवा करण्यात आनंद मानतात. अशीच गणपती बाप्पाची सेवा पुण्यातील तरूणाईने त्यांच्या शॉर्टफिल्ममधून केले आहे. 'क्लबचर' या युट्यूब चॅनेलच्या माध्यामातून गणपती बाप्पावर एक हटके शॉर्टफिल्म तयार करण्यात आली आहे.

'क्लबचर' ने गणेशोत्सव निम्मित 'बाप्पा मोरया' हा लघुपट त्यांच्या युट्यब चॅनेलवर प्रदर्शित केला आहे. लघुपटात एका वेगळ्या प्रकारे संदेश दिलेला असून यावर नामांकित कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकमान्य टिळक यांच्या विचारांतून प्रेरीत होऊन या शॉर्टफिल्मची संकल्पना मांडली आहे.

'क्लबचर'बद्दल... 
'क्लबचर' या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून संकेत अनगरकर व त्याच्या सहकाऱ्यांनी सर्वच क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ निर्माण केले आहे. कलाकार असल्याची जाणीव ठेऊन विविध कलाकारांना एकाच व्यासपीठाखाली त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी हेे तयार केले माध्यम आहे. 'क्लबचर' अंतर्गत विविध स्पर्धा, सभा, कार्यशाळा, प्रदर्शन भरविले जातात. तसेच युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या माध्यमांमधून प्रसिद्धी मिळेल. तसेच विविध उपक्रम राबविले जातील. 18 सप्टेंबरला क्लबचरचा वाचनोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati bappa moraya shortfilm by clubture