दगडुशेठच्या दर्शनाला येताय; पार्किंगची चिंता नाही आणि तेही मोफत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

महात्मा फुले मंडई कैलासवासी सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळाला ठोकलेले टाळे गुरवारी सकाळी काढण्यात आले. हे वाहनतळ वाहनचालकांसाठी विनाशुल्क खुले करण्यात आले असून त्यामुळे गणेशोत्सवात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे : महात्मा फुले मंडई कैलासवासी सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळाला ठोकलेले टाळे गुरवारी सकाळी काढण्यात आले. हे वाहनतळ वाहनचालकांसाठी विनाशुल्क खुले करण्यात आले असून त्यामुळे गणेशोत्सवात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
 
या वाहनतळाच्या ठेकेदाराकडे तब्बल 43 लाख रुपयांचे भाडे थक्कले असून ते भरण्यास टाळाटाळ केल्याने टेकेदाराला नोटीस बजावली होती. त्यानंतर वाहनतळाला सील करण्यात आले होते. परिणामी गेल्या दिड महिन्यापासून हे वाहनतळ बंद होते. ऐन गणेशोत्सवात वर्दळीच्या भागातील वाहनतळ बंद राहिल्याने वाहनचालकांचे हाल सुरु होते. त्याकडे दोन दिवसांपुर्वी 'सकाळ'ने लक्ष वेधले होते. त्याची दखळ घेत महापालिका प्रशासानाने वाहनतळ सुरु केले आहे. त्यामुळे वाहनतळ 24 तास मोफत पार्किंग उपलब्ध असणार आहे.

महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, ''ठेकेदाराकडे थकबाकी वसुल करण्यासाठी वाहनतळ बंद करण्यात आले होते. उत्सवाची गरज लक्षात घेता 24 तास मोफत वाहनतळ सुरु करण्यात आले आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune municipal Satish Seth Dhondiba Misal parking is available for free