मयुर रथात विराजमान मंडईचा शारदा गजानन गणपती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि ढोल-ताशा, बँडच्या निनादाने मंडई गणपतीची मयूर रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर चैतन्यमयी वातावरणात तीर्थंकर जैन मंदिरात शारदा-गजानन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या हस्ते दुपारी साडे बारा वाजता करण्यात आली. 
 

पुणे : गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि ढोल-ताशा, बँडच्या निनादाने मंडई गणपतीची मयूर रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर चैतन्यमयी वातावरणात तीर्थंकर जैन मंदिरात शारदा-गजानन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या हस्ते दुपारी साडे बारा वाजता करण्यात आली. 

मंदिरापासून निघालेली मिरवणुक रामेश्वर चौक, गोटीरामभैय्या चौकातून झुणका भाकर केंद्रामार्गे उत्सव मंडपात आली. न्यू गंधर्व बॅंड, राजमुद्रा, नादस्वरुप, मृत्युंजय हे ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांनी पौरिहित्य केले. रथाचे सारथ्य मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मधुकर सणस,अशोक शिर्के, कांताभाऊ मिसाळ यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharda Gajanan Ganapati of Mandai procession in Ganesh festival 2019