देखावे पाहताना अशी घ्या काळजी! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. या मुळे लहान मुले, ज्येष्ठ, महिला, तरुणींनी सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पुणे-  घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. या मुळे लहान मुले, ज्येष्ठ, महिला, तरुणींनी सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनुचित प्रकार आढळल्यास किंवा अडचण आल्यास बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. 

अशी घ्या काळजी! 
* तब्येत चांगली असणाऱ्या ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे 
* ज्येष्ठांनी कुटुंबातील एक ते दोन व्यक्तींना बरोबर घ्यावे 
* 18 वर्षांच्या आतील मुलांना एकटे सोडू नये 
* पालकांनी मुलांचे हात सोडू नयेत 
* कुटुंबातील सदस्य, ओळखीच्या व्यक्तींसमवेत जावे 
* अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवू नका 
* अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नका 
* मुले, व्यक्ती हरवल्यास पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा 
* मौल्यवान वस्तू, दागिने, जादा रक्‍कम बाळगू नका 
* बस, रिक्षाचा वापर करावा 
* दुचाकी, चारचाकी सुरक्षित ठिकाणी पार्किंग करा 
* दुचाक्‍यांना हॅंडल लॉक केल्यानंतर वायरअप लॉकही करा 
* संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळल्यास पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांना सांगा 

खिसेकापू, चोरांपासून सावध राहा. लहान मुले, ज्येष्ठ चुकणार नाहीत, याची काळजी घ्या. अडचण आल्यास पोलिस अधिकारी व कर्मचारी किंवा पोलिस चौकी, ठाण्याशी संपर्क साधावा. 
दादासाहेब चुडाप्पा, पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care looking at Ganapati Decoration