'जस्ट वन मोअर डे'ला आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

Marathi News Ashish Sahasrabuddhe International Film Festival
Marathi News Ashish Sahasrabuddhe International Film Festival

भारतीय वंशाचे अमेरीकेतील हौशी चित्रपट निर्माते पुनम आणि आशिष सहस्त्रबुध्दे या दांम्पत्याने चित्रपट क्षेत्रात केलेले पदार्पण चांगलेच यशस्वी ठरले आहे. जस्ट वन मोअर डे या त्यांच्या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळविले आहेत. 

लॉस एंजलिस आणि न्युयॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'जस्ट वन मोअर डे' या चित्रपटाने स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या यशात त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रिषी याचा मोलाचा सहभाग आहे. त्याला या चित्रपटातील निक या रोलसाठी लॉस एंजलिस चित्रपट महोत्सवात बेस्ट यंग अॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. 

या चित्रपटात एका लष्करी कुटूंबाची कथा सांगितली आहे. या लष्करी कुटूंबाच्या आयुष्यातील भावनिक रोलर कोस्टरवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. पुनम सहस्त्रबुध्दे यांनी चित्रपटाविषयी सांगितले, 'जेव्हा आम्ही पहिल्यांदा या चित्रपटासाठी नियोजन करण्यास सुरवात केली, तेव्हा हा प्रोजेक्ट आम्हाला जवळजवळ अशक्य वाटला. सहस्रबुद्धेने यांनी 'थिंक ग्रँड फिल्म्स' याआपल्या स्वत:च्या कंपनीच्या माध्यमातून चित्रपटासाठी भांडवल उभे केले. कंपनीचे काम आणि मुलांच्या शाळा यांकडे आठवडाभर लक्षं केंद्रीत करायला लागायचे त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाचे बहुतेक शूटिंग झाले. जानेवारी 2016 मध्ये चित्रीकरण सुरु झाले. या चित्रपटाद्वारे आपल्या आयुष्यातील संपूर्ण जगभरातील खरे नायक म्हणजेच लष्करी जवान आणि त्यांचे कुटूंबिय यांना वंदन करणे हे आमचे ध्येय आहे.' आशिष सहस्त्रबुध्दे यांनी, चार दिवस सासुचे आणि समांतर (ईटिव्ही मराठी), दामिनी (दुरदर्शन), यह दिल क्या करे (झीटिव्ही), अफलातून (सब टिव्ही) या टिव्ही शोज् साठी काम केले आहे.   


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com