स्पर्श शहा व्हील चेअरवरून गाणार 'हाऊडी मोदी'मध्ये राष्ट्रगीत

टीम ई-सकाळ
रविवार, 22 सप्टेंबर 2019

ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज (22 सप्टेंबर) होत असलेल्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात 16 वर्षांचा स्पर्श शहा राष्ट्रगीत म्हणणार आहे. मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज (22 सप्टेंबर) होत असलेल्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात 16 वर्षांचा स्पर्श शहा राष्ट्रगीत म्हणणार आहे. मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सुमारे 50 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि अमेरिकेमधील संबंधांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

या कार्यक्रमात भारतीय वंशाचा 16 वर्षीय स्पर्श शहा हा राष्ट्रगीत गाणार आहे. तो मोदींना भेटण्यासाठी खूपच उत्सूक आहे. स्पर्श हा रॅपर, सिंगर, लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये राहणारा स्पर्श ऑस्टियोजिनेसिस इमपर्फेक्टा या दुर्मीळ आजाराने त्रस्त आहे. या आजारामध्ये हाडे खूप कमजोर होऊन तूटतात. त्यामुळे स्पर्श कायम व्हिलचेअरवर असतो. 2018 मध्ये स्पर्शच्या जीवनावर आधारीत असलेली 'ब्रिटल बोन रॅपर' नावाची एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली आहे. सुमारे 50 हजार अमेरिकी-भारतीय उपस्थित राहणार आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू पोप वगळता इतर कोणत्याही परदेशी पाहुण्याच्या कार्यक्रमाला झालेली ही सर्वांत मोठी गर्दी असेल. "हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आज (ता. 22) अमेरिकेतील सर्वांत मोठ्या स्टेडियमपैकी एक असलेल्या एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये आयोजित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sparsh shah to sing india national anthem at howdy modi in us