World Cup 2019: विजय मल्ल्याने गाठले ओव्हल; सामन्याला उपस्थिती

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

बँकांना कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये वास्तव्यास असलेला उद्योगपती विजय मल्ल्या आज (रविवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी ओव्हलवर पोहचला.

लंडन : बँकांना कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये वास्तव्यास असलेला उद्योगपती विजय मल्ल्या आज (रविवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी ओव्हलवर पोहचला.

मल्ल्या आणि क्रिकेटप्रेम हे सर्वांना परिचीत आहे. क्रिकेटवरील प्रेमाखातर मल्ल्या आज प्रतिष्ठेची लढाई होत असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील लढतीसाठी ओव्हलवर पोहचला. मैदानावर त्याला कॅमेरात टिपले गेले. मल्ल्याने भारतातील बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावला आहे. सामना पाहण्यासाठी मी येथे आलो असल्याचे मल्ल्याने सांगितले.

इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे सामने पाहण्यासाठी विजय मल्ल्या कायम हजर असतो. यापूर्वीही भारताचे अनेक सामने त्याने पाहिले आहेत. मल्ल्याने 2 मार्च 2016 मध्ये भारतातून पलायन केले होते. भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी युके न्यायालयाने मंजुरी दिली असली तरी त्याने त्याविरोधात न्यायालयात अपील केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Mallya spotted at India vs Australia game in London