टॅटूमुळे होऊ शकतात त्वचारोग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

टॅटूमुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात असे एका संशोधनात समोर आले आहे.

न्यूयॅार्क : बदलत्या दिवसांसोबतच दररोज तरूणाईची फॅशन आणि पॅशन दोन्ही बदलत आहे. सध्या तरूणाईत टॅटूची बरीच क्रेझ दिसून येते. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावापासून ते वेगवेगळ्या डिझाईन्स अशा प्रकारचे अनेक टॅटू तरूणमंडळी काढत असतात. मात्र याच टॅटूमुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात असे एका संशोधनात समोर आले आहे.

या अभ्यासानुसार टॅटू काढण्यासाठी तयार करण्यात येणा-या शाईमध्ये निकेल क्रोमियम, कोबाल्ट यासारख्या धातूंचे घटक वापरले जातात आणि जेव्हा आपण टॅटू गोंदवत असतो, तेव्हा हेच घटक शाईमार्फत आपल्या शरीरात जातात. ज्यामुळे आपल्याला त्वचारोग होण्याची शक्यता उद्भवतात. तसेच टॅटू गोंदवत असताना त्याचा रंग आणखी उजळवण्याकरीता टायटॅनियम डायऑक्साईड हे केमिकल वापरले जाते, हे देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत धोकादायक असल्याने त्वचेचे रोग होण्याची शक्यता आणखी वाढते.

टॅटू गोंदवत असताना या सर्व धातू आणि केमिकल्समुळे त्वचारोग होण्याची शक्यता कितपत आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीदेखील धोका मात्र असतो असे मत एका जर्मनच्या संशोधन संस्थेने दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tattoos can cause dermatitis