अबब! एका बीयरचे बिल 72 लाख 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

लंडन : मागील काही दिवस पंचताराकित हॉटेलातील अवाढव्य बिलांबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. अभिनेता राहुल बोस याला दोन केळ्यांकरिता तब्बल 422.50 रुपये इतके बिल आकारण्यात आले होते. तसेच आणखी एका व्यक्तीला दोन उकडलेल्या अंड्यासाठी देखील तब्बल 1700 रूपये आकरण्यात आले होते. मात्र, युकेतील मॅंचेस्टर येथील एका हॉटेलावाल्यांनी तर हद्दच केली, त्यांनी एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला एका बीयरच्या पींटचे सुमारे एक लाख डॉलर अर्थात 72 लाख भारतीय रुपये इतके बिल आकारले आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार चष्मा न घातल्याने झाला आहे. 

ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर हे मॅंचेस्टर येथील मॅलेमेसन हॉटेल येथे रविवारी संध्याकाळी गेले होते. त्यावेळेस त्यांना एका बीयरच्या पींटचे बिल सुमारे 
एक लाख डॉलर अर्थात 72 लाख भारतीय रुपये एवढे आकरण्यात आले. संबंधित बीयरच्या फोटोसह त्यांनी ही इतिहासातील सर्वात महाग बीयर असून यासाठी माझ्याकडून सुमारे एक लाख डॉलर घेण्यात आले असल्याचे आपल्या सोशल मीडियावर लिहिले आहे. 

पीटर हे रविवारी संध्याकाळी मॅलेमेसन हॉटेलमध्ये गेले असताना त्यांनी नेहमीपेक्षा कोणतीतरी वेगळी बीयर पिण्याची इच्छा असल्याचे तेथील वेटरला सांगितले. 
त्यानंतर एक ब्रिटीश बीयर त्यांच्यासाठी आणण्यात आली. बीयर पिऊन झाल्यानंतर एक महिला वेटर बिल घेऊन आली असताना नेमका पीटर यांनी आपला चष्मा घातला नसल्याने त्यांनी न पाहताच आपल्या कार्डद्वारे बिलाची रक्कम अदा केली आणि  सबंधित रकमेची पावतीदेखील घेतली नाही.

मात्र, जेव्हा त्यांना कळाले की त्यांच्याकडून एका बीयर पींटचे तब्बल एक लाख डॉलर आकारले गेले आहेत, तेव्हा त्यांनी त्वरीत तेथील मॅनेजरशी संबंध साधला, त्यावेळेस त्यांना तीन दिवसांत या समस्येचे निवारण केले जाईल असे सांगण्यात आले. मात्र, तीन दिवसांनंतरही त्यांची अधिक गेलेली रक्कम पुन्हा मिळाली नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा हॉटेल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. सध्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची अधिक गेलेली रक्कम ही पुढील नऊ दिवसांत त्यांच्या 
बॅंक खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: मॅंचेस्टर येथील मॅलेमेसन हॉटेलमधील घटना