
Pakistan: तब्बल 1200 वर्षापूर्वीचं हिंदू मंदीर कोर्टाच्या संघर्षानंतर पुन्हा उभं राहणार
लाहोर : पाकिस्तानातील लाहोर येथील १२०० वर्षे जुने मंदिर दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर बांधण्यात येणार आहे. या मंदिरात राहत असलेल्या बेकायदेशीर लोकांना बाहेर काढण्यात येणार असल्याचं देशातील अल्पसंख्याक पूजा स्थळांवर देखरेख करणाऱ्या फेडरल संस्थेने सांगितले आहे.
इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB)ने लाहोर येथील प्रसिद्ध अनारकली बाजाराजवळ असलेल्या वाल्मिकी मंदिरावर ताबा मिळवला होता. कृष्ण मंदिराव्यतिरिक्त, वाल्मिकी मंदिर हे लाहोरमधील एकमेव हिंदूंचे कार्यशील मंदिर आहे. या मंदिरावर एका ख्रिश्चन कुटुंबाचा ताबा होता. हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा करणारे ख्रिश्चन कुटुंब गेल्या दोन दशकांपासून केवळ वाल्मिकी जातीतील हिंदूंनाच मंदिरात पूजेसाठी सोय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: "संजय राऊत भ्रष्टाचार करू शकत नाही, तो बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक"
ETPBचे प्रवक्ते अमिर हश्मी यांनी सांगितलं की, येणाऱ्य काही दिवसांत वाल्मिकी मंदिरांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. आज १००हून अधिक हिंदू, काही शीख आणि ख्रिश्चन नेते वाल्मिकी मंदिरात जमले होते. हिंदूंनी या मंदिरात धार्मिक विधी केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ख्रिश्चन कुटुंबाने गेल्या २० वर्षापासून या मंदिरावर ताबा घेतला होता.
मंदिराची जागा ETPBच्या नावावर करण्यात आली होती. त्यानंतर ख्रिश्चन कुटुंबाने २०१०-११ मध्ये जागेच्या मालकावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा वाद कोर्टात प्रलंबित होता, त्यानंतर 1992 मध्ये, भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर, एक संतप्त जमावाने शस्त्रे घेऊन वाल्मिकी मंदिरावर हल्ला केला. यात कृष्ण आणि वाल्मिकींच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील भांडी आणि क्रोकरी फोडल्या आणि मूर्तींना सुशोभित केलेले सोने चोरून नेण्यात आले होते.
हेही वाचा: संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ; 8 ऑगस्टपर्यंत मुक्काम वाढला!
कोर्टात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या एक सदस्यीय आयोगाने सरकारला आपल्या शिफारशी सादर केल्या, ज्यामध्ये हिंदू समुदायाला चांगल्या सुविधा देण्यासाठी मंदिराचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता या मंदिराचे पुर्नर्बांधणी होणार आहे.
Web Title: 1200 Year Old Hindu Temple Restored After Long Court Battle
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..