इंडोनेशियातील भूकंपबळींची संख्या 1400 वर 

पीटीआय
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

वाणी (इंडोनेशिया (पीटीआय) : इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1400 वर पोचली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो न्यूग्रोहो म्हणाले, की बुधवारपर्यंत मृतांची संख्या 1407 झाली असून, त्यात पालू शहर परिसरातील संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत 519 मृतदेहांचे दफन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

पालू आणि परिसराला बसलेल्या भूकंप आणि सुनामीचा फटका 3 लाख 10 हजार नागरिकांना बसला आहे. भूकंपाच्या तडाख्यातून वाचलेले नागरिक भूकेने व्याकूळ असून अन्नपदार्थ आणि पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जखमींची संख्या शेकडोंच्या घरात असल्याने रुग्णालयात उपचारासाठी जागा अपुरी पडत आहे. ढिगारे उपसण्यासाठी शक्तिशाली मशिन्स उपलब्ध नसल्याने मदतकार्य संथगतीने सुरू आहे. दरम्यान, जगभरातून इंडोनेशियाला मदतीचा वेग सुरू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालीन निधीतून सुमारे 15 लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

पेट्रोलसाठी चोवीस तास 
इंडोनेशियात भूकंपानंतर अनेक समस्यांनी गंभीर रुप धारण केले असून वीज, पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. इंडोनेशियातील काही भागांत पेट्रोलसाठी चोवीस तास वाट पाहावी लागत आहे. स्वच्छतागृहेच राहिलेली नसल्याने नागरिकांना शौचाला जागाच नाही. रात्रीच्या वेळी रस्त्यालगत शौच करण्याची वेळ नागरिकांवर आल्याचे 50 वर्षीय अरमावती यारमीन यांनी सांगितले. पालू शहरात काही भागांत मंगळवारी सायंकाळी वीजसेवा सुरू झाली. पाणी, पैसे आणि पेट्रोलसाठी नागरिकांना तिष्ठत राहावे लागत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1400 death of earthquakes in Indonesia